बॅकेची वाटचाल येत्या काळात शेड्युल बॅकेकडे — अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते !

नांदेड मर्चट बँकेची६३ वी वार्षिक सभा शांततेत संपन्न
———————-
बँकेची वाटचाल येत्या काळात शेड्यूल बँकेकडे – अध्यक्ष दिलीप कंटकुते !
——————————————-
बॅक एनपीएस शून्य टक्के
सभासदाचा एक लक्ष रुपयांच्या अपघाती विमा
साडे आठ टक्के लाभांश
लातूर -आखाडा बाळापूर येथे दोन नवीन शाखा सुरू होणार
—————————————–
नांदेड (रत्नाकर महाबळे)
मराठवाड्यात दूसरी शेड्यूल बँक होण्याकडे नांदेड मर्चट बँकेवी वाटचाल सुरु आहे. येत्या काळात हा दर्जा निश्वितच प्राप्त होईल. सभासदांच्या हिताकडे ध्यान देत, बँकेने आपलया बॅंकेची वाटचाल गेल्या ६३वर्षापासून प्रगतीच्या दिशेने सुरू ठेवली आहे .बँकेला या आर्थिक वर्षात ७ कोटी २७ लक्ष इतका नफा झाला असून एनपीए शून्य टक्के इतका आहे . सभासदांना साडे आठ टक्के लाभांश देण्यात आला असून प्रत्येक सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला असून येत्या काळात दोन नवीन शाखा सुरु होणार आहे.सभासदांचे सहकार्य व ग्राहकांचा
विश्वास ही वाटचाल सुरू आहे यापूढेही अशीच साथ मिळेल असे संबोधन नांदेड मर्चंट बैंकेचे अध्यक्ष दिलीप कुंदकर्ते यांनी केले
नांदेड शहरातील शिवाजी नगरातील विसावा पॅलेस येथे दि-नादेड मर्जट को-ऑप बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष दिलीप कुंदकुर्ते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपाध्यक्ष
लक्ष्मणराव संगेवार , माजी अध्यक्ष जेष्ठ संचालक ज्ञानेश्वर महाजन , मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकार , संचालिका वसुधा तगडपल्ले ,
उमेश जालनेकर, रविकुमार कासलीवाल, श्रीमती प्रभादेवी देव, ओमप्रकाश राखेवार, जी. एस. चिटमलवार दिपक चन्नावार, सुनील मानधनी ,श्रीकांत वट्टमवार, अरुण चालिकवार, कैलास राठी, हरिहर धुतमतल, विजय वटटमवार (तज्ञ संचालक) याची उपस्थिती होती
बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकूर्ते,६३ वा वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वाचन केला. त्यांनी बँकेच्या वाटचालीत सभासदाचे असलेले योगदान अधोरेखित केले. यावर्षीही बँकेला अ वर्ग ‘अँडीट दर्जा मिळाला असून लाभांश आरबीआयच्या नवीन नियमानुसार साडे आठ टक्के आपण जाहीर केला आणि तो सभेनंतर प्रत्येकाच्या बँक खाती जमा होणार आहे असे सांगितले
लातूर व आखाडा बाळापूर येथे नव्या दोन बँक शाखा सुरु करण्यात येत आहेत . सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा दरवर्षी काढतो यंदा तो काढला असून बँकेत जेष्ठ नागरिकां बाबत काही करता येईल काय यावर आम्ही निश्चित प्रयत्न करू आपली बँक शेड्यूल बँक व्हावी या दृष्टीने वाटचाल सुरू असून आपली साथ -सहकार्य असावे असे अहवान बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकूर्ते यांनी केले बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव संगेवार जेष्ठ संचालक ज्ञानेश्वर महाजन जी. एस. चिटमलवार रवीकुमार कासलीवाल यांनी ठराव मोडले. वार्षिक सर्वसाधारण सभेतील सर्व ठराव एकमताने व टाळ्यांच्या गजरात सभासदांनी मंजूर केले यावेळी बँकेच्या अधिकारी प्रतिभा देशमुख यांनी संचलन व अहवाल वाचन केले सभासदांच्या शंकाचे निरासरण केले
नव्याने रुजू झालेले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांचा बँकेचे अध्यक्ष श्री कंदकूर्ते यांनी सत्कार केला
गोंडवणा विद्यापीठाचे पूर्व कुलगुरु कल्याणकर संपादक शंतनू डोईफोडे, राजेंद्रसिंह शाहू , विष्णू मानधनी राजेंद्र भारतीया, अशोकसिंह रावत, रंगभूमी सदस्य राम चव्हाण बालाप्रसाद पारेख, नित्यानंद मैय्या, पवन गादेवार, काळे गुरुजी, दिगबर लाभशेठवार यांच्या हस्ते दहावी बारावी मध्ये ऐंशी टक्के पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या सभासदांचा व बँक कर्मचाऱ्याच्या पाल्यांचा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ‘आरंभी सरस्वतीचे पुजन करण्यात आले त्यानंतर ज्ञात अज्ञात मरण पावलेल्याना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली बँकेच्या कर्मचाऱ्याऱ्यांनी यासाठी परिक्रम घेतले



