Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोहाच्या आश्रम शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा !

लोहाच्या आश्रम शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा !
———————————————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे) लोहा येथील सोमसिंग नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पुष्पावती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील गोविंदराव जाधव आणि सौ. राणी स्वप्निल जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वर्गीय सोमसिंग नाईक माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पि एन संगेवार तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी डी आर शिंदे,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शेख अहमद, सरचिटणीस रत्नाकर महाबळे ,हुलेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणेश राजारूपे,बी डब्लु चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख बापूसाहेब कापुरे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबुलगेकर यांनी आश्रम शाळा आज पर्यंत कशा पद्धतीने प्रगती केली याविषयीचा आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविकास सांगितला तर निवेदन चोले यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर आपली कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला सारून या स्पर्धेच्या युगात आपली क्षमता देखील दाखवून देण्याची गरज आहे त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम करून आपले व आपल्या शाळेचे नावलौकिक करावे .
पत्रकार रत्नाकर महाबळे मनोगत व्यक्त करताना सांगितले की शाळेमध्ये अशा विविध गुणदर्शन कार्यक्रमामुळे भविष्यात विद्यार्थी कवी, लेखक, नायक कथाकार, नाटककार ,बनू शकतो त्यामुळे शाळेने असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे अशा शुभेच्छा या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी दिल्या
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पीएम राठोड , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पी एन संगेवार, सौ राणी जाधव मॅडम गंपू राठोड , चोले, फाजगे, शिंदे, जोंधळे, वाघमारे,नाईक, घोडजकर यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button