यळकोट यळकोट जय मल्हार घोषाणे बेल भंडाऱ्याची उधळण करीत माळेगाव यात्रेला सुरुवात !

यळकोट यळकोट जय मल्हार घोषाने बेल भंडाऱ्याची उधळण करीत माळेगाव यात्रेला सुरुवात. !
———————————————————————
लोहा (रत्नाकर महाबळे )
येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्दतीने यंदाही माळेगावच्या श्रीखंडोबा रायाच्या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानक-यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने मानाचा फेटा, शाँल व मानधन देवून स्वागत करण्यात आले.
प्रारंभी सकाळी शासकीय पुजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत,
जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजूषा कापसे, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, अमित राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे- चिखलीकर, चंद्रसेन पाटील, पुरुषोत्तम धोंडगे, व्ही.आर. बेतीवार, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, रोहित शिंदे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार शंकर लाड, गट विकास अधिकारी अडेराघो, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता मोहन पवार, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग लोहा चे अभियंता शिवाजी राठोड, माजी सभापती संजय पाटील कराळे, काॅग्रेस लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, रंगनाथ भुजबळ, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, बाजार समितीचे संचालक साहेबराव काळे, यांच्या सह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी,लोहा पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेल भंडाऱ्याची उधळण करीत पालखी शासकीय विश्रामगृह येथे येताच मानकरी याचा सत्कार करण्यात
पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकंदडे (आष्टुर) या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्यात आला.
खंडोबा यात्रेत वाघ्या-मुरळी –
उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेजूरी उत्तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करते. पारंपारीक पध्दतीने कवडयाच्या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तर लोह्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी पालखी सोहळा पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



