Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

नाही रे वाल्याचा आवाज उठवायची ताकद जागतिक गुराखी साहित्य संमेलनात — प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे !

नाही रे वाल्यांचा आवाज उठवायची ताकद जागतिक गुराखी साहित्य संमेलनात——-प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे !
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा तालुक्यातील गुराखी गडावर माजी खासदार व आमदार जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत डॉ केशवराव धोंडगे गुराखी ‌साहित्य नगरीत दि.२६ ते २८ जानेवारी पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या ३० व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाला ज्ञान हंडी फोडून २६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरूवात झाली.
जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी देविदास फुलारी संमेलनाध्यक्ष दत्ता देवकांबळे, स्वागताध्यक्ष डॉ.पुरुषोतम केशवराव धोंडगे,प्रमुख पाहुणे यादवराव कोलंबकर , राघिणी देवकर, दिलीप चव्हाण स्वा.रा.ति.वि.नांदेड,बायनाबाई शामराव पवार गुराखी पीठ कुलगुरू , तसेच शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड, प्राचार्य निवृत्ती कौशल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व माजी आमदार दिवंगत भाई केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून सुरुवात झालेल्या तीन दिवस चालणाऱ्या ३० व्या जागतिक गुराखी ‌साहित्य संमेलनाचा प्रारंभ दि. २६ जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील मोठ्या उत्साहात गुराखी गडावर झाला.तत्पूर्वी पायी दिंडी पदयात्रा कामाईच्या झऱ्यापासून शाळेतील विद्यार्थ्यांनी कंधार – लोहा रोड मार्गावरुन लेझीम ,टाळ, मृदंगाच्या विविध वाद्यांच्या गजरात वेगवेगळ्या पोशाखात असलेले विद्यार्थ्यी,समाजातील सर्व स्तरातील लोकांचे दर्शन घडून आले.गुराखी,सालदार,पोतराज,वासूदेव,बहुरूपी, बैलवाले, शाहीर,देवकर,राईंदर, फकीर , विविध नृत्यन करत लमाणी गीताचे गायन लमाणी माता भगिनी,गोंधळी अशा असंख्य विविध ग्रामीण कलाकारांनी देखाव्यांसह सजून नटून-थटून मूळ कलागुणांना वाव देत पायी दिंडी पदयात्रा ३ कि.मी.अंतर कापून थेट गुराखी गडावर धडकली.जागतिक साहित्य संमेलनातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले
प्रास्ताविकात प्रा. डॉ पुरूषोत्तम धोंडगे म्हणाले की, डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून गेली एकोणतीस वर्षापासून जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. संमेलनात नाहीरे वाले, कुणबी राजे सरदार राजे गुराखी कलावंतांना आपल्या कला गुण गुराखी पिठावर सादर करण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ म्हणून जागतिक गुराखी साहित्य संमेलनात उपलब्ध झालेले आहे.त्यांच्या पश्चात केशवराव धोंडगे यांची उणीव आपण कदापि भरून काढू शकत नाही तरी त्यांच्या सर्वच परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानले.समाजातील सर्वच उपेक्षितांना , नाहिरेवाल्यांना न्याय द्यायचे काम करण्याचा शब्द दिला. डॉ. धोंडगे साहेबांनी स्वाभिमानाने मर्दुमकीने जगायला लढायला शिकवलं तो अधिकार गुराखी पीठाने दिला.ज्यांना कुणाला व्यासपीठावर संधी मिळत नाही त्यांना ही संधी उपलब्ध करून देवून गुराख्यांसाठी व्यासपीठ निर्माण करण्याचे काम धोंडगे साहेबांनी केले असल्याचेही प्रा. डॉ. पुरूषोत्तम धोंडगे म्हणाले.प्रास्तविकात बाबांच्या केलेल्या कार्याचा पाढा वाचताना, आठवणींना उजाळा देताना स्वागताध्यक्ष पुरूषोत्तम धोंडगे यांचा कंठ दाटून आला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत दिवंगत भाई केशवरावजी धोंडगे यांच्या कार्याला अनेकांनी उजाळा दिला.प्रामुख्याने माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे,माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड,शंकरराव आंबटवाड,व्ही जी चव्हाण, उप प्राचार्य एस वि मंडगे ,प्रा.नागपुर्णे, मुख्याध्यापक एस आर लुंगारे ,मुख्याध्यापक डी एस बोधगिरे , हरि पाटील शिंदे , बालाजी परोडवाड ,
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते‌.सदरील पहिल्या दिवशीच्या प्रथम सत्राचे सुत्रसंचलन माधवराव पेठकर यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button