Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

गावोगावी शाळेच्या वेळात मोबाईल बंद ठेवण्यासाठी सरपंच यांनी पुढाकार घ्यावा — प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज !

गावोगावी शाळेच्या वेळात मोबाईल बंद ठेवण्यासाठी सरपंचानी पुढाकार घ्यावा – प्रसिद्ध कीर्तनकार हभप इंदोरीकर महाराज

—————————————-
आ चिखलीकर याच्यावर प्रेम करणारे हजारों कार्यकर्ते या जिल्ह्यात.
●लोकनेते आहेत म्हणूनच लोकांच्या गराड्यात असतात
● लोहा कंधार मध्ये आज विविध उपक्र
—————————————
लोहा (रत्नाकर महाबळे)
गावोगावी सरपंचांनी गावातील प्रमुखांनी शाळेत जाऊन तेथील समस्या जाणून घ्यावी तसेच आमदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना शाळा वेळात मोबाईल व्हावा यासाठी शिक्षक विद्यार्थी यांना सांगणे आणि त्याची अंमलबजावणी करावी त्याचा सामाजिक फायदा होईल असे सांगून आपण काय करावे आणि काय करू नये हे परखडपणे सांगताना येत्या काळात समाजा समोरील असलेली आव्हाने किती धोकादायक आहेत हे विशद करताना प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आजच्या सोशल मीडियाच्या व्यवस्थेतून बाहेर पडण्याची गरज असल्याचे सांगितले
लोकनेते, माजी खासदार, व आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम मोरे व सहकाऱ्यांच्या वतीने लोहयातील नांदेड बायपास येथील
स्व बाळाजी पाटील मंगल कार्यालयात
महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन पार पडले
पार पडला.
हभप इंदोरीकर महाराज यांनी आजच्या बदलत्या व्यवस्थेवर आपल्या कीर्तनातून परखड मत व्यक्त केले. पैसा जपून वापरा. शेतीत होणार अमाप तणनाशकाचा वापर जमिनीची पोत खराब करणारी असून शेती विकून गाडी बंगाल घेण्याची चढाओढ सुरू आहे.तसेच मोबाईल चा अति वापर यावर यासह अनेक विषयांवर त्यांनी भाष्य करत उपस्थितांना अंतर्मुख करण्यास भाग पाडले
लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपण माझ्यावर एवढे प्रेम करता यासाठी शब्दात व्यक्त करणे शक्य नाही असे सांगून संग्राम मोरे व सहकाऱ्यांनी हा सोहळा आयोजित केला आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले
तसेच सर्वांचे सहकार्य व आपुलकी अशीच राहावी असेही भावना व्यक्त केल्या
या कीर्तन सोहळ्यास माजी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, नांदेड दक्षिणचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक मुक्तेश्वरराव धोंडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ.सुनंदाताई जोगदंड, कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.अनुसयाताई केंद्रे, लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार कंदार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वप्नील पाटील लुंगारे माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माणिकराव मुकदम,कल्याणराव सूर्यवंशी माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धूतमल, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालाजी पाटील मारतळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील सावळे, प्रा.सुनील नानवटे, हंसराज पाटील बोरगावकर, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, खुशाल पाटील पांगरीकर, बाबुराव केंद्रे, मारोती पाटील बोरगावकर,, नामदेव कटकमवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण अध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, केशवराव मुकदम, माजी नगरसेवक भास्करराव पवार, नामदेव कटकमवार, देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर, संतोष नारलावार, दिगंबर कौरवार, दिलीप पाटील कारेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेवालाल जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर, गणेशराव शिंदे मरळककर, दत्ता पाटील हाळदेकर, चेतन केंद्रे, हरिभाऊ चव्हाण यांच्यासह लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे नियोजन संग्राम पाटील मोरे, अनिल पाटील बोरगावकर, राजेश मोरे यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता
प्रा संदीप वाघ यांनी संपादित केलेले कॅलेंडरचे प्रकाशन तसेच छत्रपती धुतमल अनिल धुतमल प्रवीण धुतमल यांनी काढलेल्या कापडी पिशविचे प्रकाशन आ प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

.संचलन व आभार विक्रम कदम यांनी केले किर्तनास मोठा जनसमुदाय उपस्थित होत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button