परिस्थिती यशाच्या आड येत नाही —प्रणिता ताई देवरे -चिखलीकर !

परिस्थिती यशाच्या आड येत नाही — प्रणिताताई देवरे चिखलीकर
——————————————–
लोहा (प्रतिनिधी )
यशाला शॉर्टकट कधीच नसतो. परिश्रम करा अभ्यासात सातत्य असले पाहिजे .परिस्थिती ही यशाच्या आड येत नाही . स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अपडेड असावा लागतो मोबाइल चा वापर शक्य तो टळला पाहिजे .वाचनाची आज गरज आहे तरच आपणास स्पर्धेत यश मिळविता येईल असे मार्गदर्शन जल चळवळीच्या प्रणेत्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले
कालवश संभाजीराव धुतमल प्रतिष्ठाण आणि जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याच्या वतीने लोकनेते जननायक आ प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या वाढदिवसानिमित्त दहावी-बारावी बोर्ड परीक्षा व एकल पालक विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रणिताताई देवरे चिखलीकर याच्या हस्ते करण्यात आले
व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , माजी उपनगराध्यक्ष दता वाले, प्रा डॉ डी एम पवार, हरीभाऊ चव्हाण, शोभाताई बगडे-नळगे, माजी कृउबा उपसभापती मारुती पाटील बोरगावकर, आयोजक उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, माजी नगरसेवक करीम शेख, पंचशील कांबळे, भास्कर पाटील पवार, बी डी जाधव रत्नाकर महाबळे, इमाम लदाफ, डी एम काहळेकर,
बी डी जाधव, बुद्धभूषण खिल्लारे, भानुदास पाटील यांची उपस्थिती होती.
जलचळवळीच्या प्रनेत्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी विद्यार्थ्यांना अथक परिश्रम करण्या सोबतच यशाला परिस्थितीचा अडथळा येत नाही असे सांगितले .वाचाल तर वाचाल यावर भर देत स्पर्धेच्या काळात मेहनत घ्यावी लागणार आहे असे सांगून लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या कार्याचा त्यांनी गौरव केला तसेच या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकल पालक विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप कारण्यात आले.दहावी बारावी बोर्ड परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन प्राणिताताई व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याव)प्रसंगी प्रा डॉ .धनंजय पवार, माजी नगरसेविका शोभाताई बगडे-नळगे, भास्कर पाटील पवार, , राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथ शिरसिकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.होतकरू व गरजवंत विद्यार्थ्यांला दहावी नंतर दोन वर्षे शिक्षणासाठी शैक्षणिक आर्थिक मदत करणारे पत्रकार एकनाथ तिडके, तसेच रुग्ण सेवा समितीवर सदस्य म्हणून नियुक्त झालेले मारुती पाटील यांचा प्रणिताताई देवरे याच्या हस्ते सत्कार कारण्यात आला. आयोजक छत्रपती धुतमल,प्रवीण धुतमल , रत्नाकर महाबळे, ओमपुरी, बालाजी धनसडे,गजले, अक्षय जोंधळे , तनय धुतमल यांनी मान्यवरांचा सत्कार केला
अभ्यासिकेचे संस्थापक हरिहर धुतमल यांनी प्रास्ताविक केले.संचलन काशिनाथ शिरसिकर यांनी तर आभार रत्नाकर महाबळे यांनी केले



