लोहा शहरातील जनतेनी पाण्याचा जपून वापर करावा — मुख्याधिकारी प्रियांका टोगे !

लोहा शहरातील जनतेनी पाण्याचा जपून वापर करा: अपव्यय टाळावा-मुख्याधिकारी प्रियंका—- टोंगे!
——————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे )
यंदा पाऊस फार झाला नाही त्यामुळे लिंबोटी धरणात केवळ २९ टक्के पाणी साठा आहे.शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या सुनेगाव तलावात जेमतेम ३५टक्के इतका जलसाठा आहे शिवाय लिंबोटी धरणातून नदी पात्राद्वारे पाणी सोडण्याची शक्यता फारशी दिसत नाही असा परिस्थितीत शहरातील नागरिकांनी संभाव्य पाणी टंचाई उदभवू शकते त्यामुळे पाण्याचा आता पासून काटकसरीने वापर करावा.नळाला तोट्या बसवाव्यात पाण्याचा अपव्यय थांबवावा जेणेकरून भीषण पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल असे आवाहन लोहा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी केले आहे
लोहा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावातील अनधिकृत विद्युत मोटारी पाटबंधारे विभागाने तात्काळ काढून टाकाव्यात जे बेकायदेशीर पाणी उपसा करत असतील असाविरुद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे पण पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात लवकरच पाणी टंचाई निर्माण होऊ शकते असा तक्रारी जनतेतून होत आहेत
मुख्याधिकारी श्रीमती टोंगे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर त्यांनी प्रशासकीय शिस्त कर्मचाऱ्याच्या निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत
सुनेगाव तलावात सध्या ३५ टक्के इतका पाणीसाठा आहे तो उन्हाळाभर शहराला पुरवठा होणार नाही तसेच नदीपात्रातून लिंबोटी धरणाचे पाणी तलावात सोडले जाते.पण धरणात २९ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.नगर पालिकेचे पाणी आरक्षण लिंबोटी धरणावर आहे.पण नदीपात्रातून पाणी सुनेगाव तलावात सोडण्याची शक्यता धूसर दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच नळांना तोट्या बसवाव्यात .पाणी बचत करावी.अपव्यय टाळावा आता पासून जर सर्व शहर वासियानी पाणी बचतीसाठी प्रयत्न केले तर निश्चितच तलावातील पाणीसाठा जास्त दिवस जाऊ शकतो .पाणी कितीवेळ सोडायचे याबाबत नगर पालिका पंप ऑपरेटर यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच जागरूक नागरिकांनी आपापल्या भागात पाणी बचतीसाठी जनजागृती करावी तसेच शाळा – महाविद्यालय स्तरावर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व घरोघरी पाणी बचतीसाठी जनजागृती व्हावी असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी केले आहे.शहरातील नागरिकांनी संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याची बचत करावी,नळांना तोट्या बसवाव्यात पाणी भरणे झाल्या नंतर ते नालीच्या सोडून न देता त्या नळाला बंद करावे पाणी अपव्यय थांबववा असे आवाहन करण्यात आले आहे



