शिव छत्रपती विद्यालयात केंद्र स्तरीय शिक्षण परीषद संपन्न !

शिवछत्रपती विद्यालयात केंद्र स्तरीय शिक्षण परीषद संपन्न!
—————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
सशिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संकुल ब्रॅंच लोहा अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी शाळेच्या शिक्षकांची दुसरी केंद्र स्तरीय शिक्षण परिषद गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली
शिव छत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक श डी. ई.वडजे* यांच्या अध्यक्षतेखाली, पार पडली.
गट शिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील संकुला अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळातील शिक्षकांसाठी दरमहा शिक्षण परिषद घेतली जाते .ऑगस्ट महिन्याची ब्रँच संकुलाची शिक्षण परिषद शिवछत्रपती विद्यालयात मुख्याध्यापक दामोदर वडजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी आर शिंदे प्रा शाळेचे मु अ हानमंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती
पार पडली शिक्षण परिषदेमध्ये केंद्रीय मुख्याध्यापक श्री ज्ञानोबा कोरडे यांनी,( SHVR-registration)व इतर शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.तर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दामोदर वडजे यांनी शासनाचे दररोज येणारे शासन निर्णय शासन निर्णय व त्यावर उपाययोजना कशी करायची हे सांगून केंद्रातील सर्व शिक्षकांना व बदली होऊन काही दिवसात दुसऱ्या शाळेत जॉईन होणारे सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या श्री एम एन केंद्रे सर,श्री सी एस वाडकर सर,श्रीमती पी एस पारसेवार मॅडम ,श्रीमती टी के तिडके मॅडम
या सुलभकांनी शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवायचे आहेत व येणाऱ्या नवीन सूचनांची कशी अंमलबजावणी करायची या विषयी मार्गदर्शन केक
तज्ञ शिक्षक रवी रायफल शिक्षक नेते ज्ञानोबा घोडके यासह ,शरद पवार हायस्कूल चितळी,शिवाजी विद्यालय बेरळी, आश्रम शाळा लोहा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरळी,जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा लोहा ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोलीस वाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मस्की,रमणा तांडा देवणेवाडी, तारदाळ तांडा, अहिल्यानगर देऊळगाव, देऊळगाव,जि.प.शाळा चितळी येथिल सर्व शिक्षक उपस्थित होते.
हसवत व अंतर्मुख करणारेबहारदार सूत्रसंचालन बालाजी गवाले यांनी केले.



