Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

शिवछत्रपती विद्यालयात पोलीस दादा — दिदी जनजागृती मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

शिवछत्रपती विद्यालयात पोलीस दादा-दिदी”
जनजागृती मोहिमेतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !
——————————————-
लोहा (प्रतिनिधी )
मोबाईल सोशल मिडियाचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. अल्पवयीन मुले-मुली मिसिंगच्या घटनेत होणारी वाढ कौट्रेबिक दृष्ट्या चिंताजनक असून शाळकरी विद्यार्थी नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढते आहे अशा अनेक अपवृती समाजात शालेय विद्यार्थ्यांत वाढत आहेत त्या अनुषंगाने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना कायद्यांची माहिती तसेच जनजागृती व्हावी यासाठी पोलीस दादा-, पोलीस दीदी’ या उपक्रमा अंतर्गत शिवछत्रपती विद्यालयात लोहा पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
शिवछत्रपती विद्यालयातील नववी-दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना ” पोलीस दादा-पोलीस दीदी “या मोहिमेतर्गत पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली ” जाणीव जागृती ” करण्यात आहे. मुख्याध्यापक दामोधर वडजे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरिक्षक संतोष पाटील, गुप्त शाखेचे प्रमुख सदाशिवराव जामकर प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक होते यावेळी क्रीडा शिक्षक दिलीप कहाकेकर, प्रसिद्ध निवेदक बालाजी गवाले, हरिहर धुतमल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस उपनिरिक्षक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना ध्येय ठेवून अभ्यास करा अन्यत्र लक्ष भटकू देऊ नका असे मार्गदर्शन केले. डीएसबी प्रमुख जामदार सदाशिव जामकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मिसिंग मुला-मुलींच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम , तसेच ११२ डायल कधी करायचे . शिवाय घडणाऱ्या घटना त्याचा आई वडील कुटुंबावर होणार परिणाम याची माहिती दिली. मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी’ या उपक्रमाची सामाजिक गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. हरिहर धुतमल यांची प्रास्ताविक तर प्रभावी सूत्र संचलन बालाजी गवाले यांनी केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्न त्याचे निराकरण पोलीस अधिकाऱ्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button