लोहा –गंगाखेड मार्गाचे दुपदरी करणाचे काम सुरू आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश !आ

लोहा – गंगाखेड मार्गाचे दुपारीकरणाचे काम सुरू : आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश !
——————————————-
नांदेड (रत्नाकर महाबळे)
लोहा – गंगाखेड या चौपदरीकरणाच्या मार्गाला मंजुरी मिळाली असून रस्त्याचे कामही सुरू झाले आहे. या कामासाठी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा मार्ग नव्याने तयार होणार असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती आ.चिखलीकर यांनी दिली आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार असताना प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध भागात रस्ते विकासाचे जाळे विणले आहे. एवढेच नाही तर नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडून नांदेडला खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या दळणवळणाच्या प्रवाहात आणले आहे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ ही या विकासात मागे राहू नये यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार राहिला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यात लोहा – गंगाखेड या 41 किलोमीटर रस्त्याही समावेश आहे. हा रस्ता अत्यंत छोटा आणि खराब झाल्याने या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे आहे. रस्ता मंजूर केल्याबद्दल आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाअशी मागणी त्यांनी केली होती शिवाय रस्ता दुपदरीकरणाचा करावा यासाठीही त्यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली होती. अखेर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. तब्बल 355 कोटी 11 लाख रुपये या रस्त्यावर खर्च केले जाणार असून निधीची तरतूदही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलीथराव शिंदे यांचे आभार मानले आहेत.


