नीट 2024 निकालात आयआयबी महाराष्ट्रात अव्वल !

नीट २०२४ निकालात आयआयबी महाराष्ट्रात अव्वल…!
१००% ओरिजनल निकालामुळे विद्यार्थी पालकांना आयआयबीचा विश्वास
——————————————–
नांदेड (रत्नाकर महाबळे)
महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबीने ४ जून रोजी जाहीर झालेल्या नीट २०२४ च्या निकालात ऐतिहासिक कामगिरी करत गुणवत्तेचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे या वर्षीच्या निकालात सिंद्धात राख याने ७१० गुण मिळवत सर्वोत्तम स्थान प्राप्त केले आहे तर यासोबतच आयआयबी च्या तब्बल ६ विद्यार्थ्यांनी ७०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत त्यासोबत महत्वपूर्ण बाब म्हणजे आयआयबीच्या निकालात झळकेलेले सर्व विद्यार्थी हे आयआयबीचे क्लासरुम स्टुडन्टस् आहेत हे या निकालाचे मुख्य वैशिष्टयै आहे.
आयआयबीच्या ७०० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत ऋुषीकेश गायकवाड ७०५ , ओम येसने ७०५ , कु.प्राजक्ता भगत ७०० , महेश सत्यधर ७०० , कु.सानिया मिरजे ७०० या विद्यार्यांनी बाजी मारली असून याशिवाय इन्टिट्यूटच्या तब्बल २२५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी ६५० पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत यासह फिजिक्स , केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत निकालावरून नीट २०२४ च्या निकालात महाराष्ट्रासह देशात गुणवत्तेचा अमीट ठसा आयआयबी इन्स्टिट्यूट उमटविला आहे . या कामगिरीच्या बळावर याही वर्षी आयआयबी हे महाराष्ट्रातून एमबीबीएसला सर्वाधिक विद्यार्थी पाठविणारे इन्टिट्यूट ठरणार आहे.
सलग २५ वर्षापासून “आयआयबी आहे तर विश्वास आहे” हे वाक्य केवळ बिरुद नाही तर विद्यार्थी पालकांच्या तोंडून आयआयबी म्हटले की आपसूकच बाहेर पडते यावरून म्हणजे गुणवत्तेचा ओरिजनल विश्वास हे समीकरण आणखी बळकट होत आहे. नीट-वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा वन नेशन एक्साम च्या धर्तीवर २०१७ सालापासून लागू करण्यात आली होती. दरवर्षी मे महिन्यात नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए कडून या परिक्षेचे आयोजन केले जाते. यावर्षीही ५ मे रोजी देशभरात ही परीक्षा पार पडली आहे.नीट चा निकाल ४ जून रोजी घोषित करण्यात आला आहे. त्यात सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.तसेच ६५० पेक्षा अधिक गुण घेणारे २२५ पेक्षा जास्त विद्यार्थी असून यावर्षीही आयआयबी च्या सर्वाधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेश मिळेल असे संचालक दशरथ पाटील यांनी निकालावर प्रतिक्रिया देतांना सांगितले.
——————————————–
आयआयबी नीट २०२४ निकाल गुणात्मक वैशिष्ट्यै ..
· सर्वोत्तम कामगिरी नोंदविणारे सर्व विद्यार्थी हे
आयआयबी क्लासरुम स्टुडन्टस्
· सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बॅचेस मधून अव्वल निकाल
· नीट च्या निकालातून महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स
घडविणारे इन्टिट्यूट


