उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट ; रूग्ण व नातेवाईक यांचे बेहाल !

उपजिल्हा रुग्णालयात ‘पाण्याचा’ ठणठणाट; रुग्ण व नातेवाईकांचे बेहाल ; कुटुंब शस्त्रक्रिया बंद !
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मुहूर्ता पासूनच ‘पाण्याची भीषण ‘ समस्या निर्माण झाली आहे. संबंधित गुतेदाराने इमारत बांधकाम करताना पाण्याची दीर्घकालीन सोय केली नाही. शहराची मातृसंस्था असलेल्या नगर पालिका प्रशासनाने पाच वर्षात शहराच्या उपयुक्त मूलभूत सुविधेकडे पाठ फिरविली. त्याचा दूरगामी परिणाम शहरातील जनतेला सहन करावा लागणार आहे .त्याचे पहिला फटका आरोग्य सुविधेला बसला आहे
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आजघडीला पाण्याचा ‘ठणठणाट’ असून रुग्ण- व नातेवाईक यांचे बेहाल असून स्वतःचं पाणी आणत आहेत तर दुसरीकडे • पाण्या अभावी ‘कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया बंद झाल्या आहेत
लोहा शहराच्या जडणघडणीत जून्या- जाणत्या नेत्यांचे मोठे योगदान आहे पण बदलत्या काळात नवीन’ पिढीच्या ‘कारभारऱ्यांना याचा विसर पडला’ हेव्यादाव्यात मुलभूत सुविधा सापडल्या. रुग्णालयातील सुविधेसाठी माजी नगराध्यक्ष माणिकराव पाटील, कल्याणराव सूर्यवंशी, श्रीमती इंदूरकरबाई, जिजाबाई मुकदम, कल्याणराव सूर्यवंशी, त्रिशलाबाई कांबळे किरण वट्टमवार
, आशाताई चव्हाण,यांच्या कार्यकाळात आवर्जून लक्ष दिले जात होते. त्याच्या सोबतच्या उपनगराध्यक्ष याचेही आरोग्य विभागाकडे ध्यान असायचे पण अलीकडच्या काळात नगर परिषदेत
मनमानी कारभार सुरू झाला आणि उपजिल्हा रुग्णालयाचे दायित्व आपलेही आहे याचा नगर परिषद प्रशासन याना विसर पडला.
रुग्णालयाने पाण्याच्या अनुषंगाने अनेकदा पत्रव्यवहार करून ही पालिकीने दवाखान्यासाठी पाण्याची सोय केली नाही. आज रुग्ण नातेवाईक याचे बेहाल सुरू आहेत आपल्या गावचा दवाखाना ‘ही बाब पैशाच्या प्रचंड उधळपट्टीत मागे पडली
आज लोह्याचे उपजिल्हा रुग्णालय
पाण्यासाठी टाहो फोडते आहे . रुग्ण व नातेवाईक स्वतः ये पाणी सोबत आणत आहेत. शौच्छालय पाण्या अभावी बंद आहेत. वैदयकीय अधिक्षक डॉ अब्दुल बारी हे रजेवर आहेत तर डॉ प्रशांत जाधव यांच्याकडे पदभार आहे ते आपल्या परीने व्यवस्था करत आहेत
●कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया २० दिवसापासून ‘बंद’
—————–
लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात निष्णात डॉक्टर आहेत पण नियंत्रण नाही बीपी व शुगर चा उपचार – गोळ्या वेळेत मिळत नाहीत. तर दुसरीकडे पाण्या अभावी कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया गेल्या वीस दिवसा पासून बेद आहेत. सकाळी ओपीडी वेळेत सुरू होत नाही रुग्णांना ताटकळत बसावे लागते ज्यांच्याची ड्युटी असते त्याची “काय कोणाची भीती” अशी भूमिका असते त्यामुळे रुग्णाची हेळसांड सुरू आहे
‘● माजी आमदार चव्हाण मदतीला ‘ धावले”
————–
माजी आ. रोहीदास चव्हाण यांनी स्वतःच्या टँकरद्वार रुग्णालयास दररोज मोफत पाणी पुरवठा केला आहे. त्याच्या दातृत्वामुळे रुग्ण व नातेवाईक याना दिलासा मिळाला पण कायमस्वरूपी पाण्याची सोय असायला पाहिजे रुग्णालयाच्या समस्येवर नगर पालिका . प्रशासक अरुणा संगेवार व मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर यांनी लक्ष देऊन रुग्णालयात पाण्याच्या व्यवस्थेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे


