डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर २१ रोजी लोह्यात निर्धार मेळाव्यास करणार मार्गदर्शन !

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर २१ रोजी लोह्यात : निर्धार मेळाव्यास करणार मार्गदर्शन !
————————————————————————
लोहा (रत्नाकर महाबळे)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व ऍड प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे लोह्यात येत असून .गुरुवारी २१तारखेला सांयकाळी पाच वाजता शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्यास संबोधित करणार आहेत तेव्हा मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी जिल्हा महासचिव श्याम कांबळे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, युवा जिल्हाध्यक्ष धिरज हाके, सुरेश गजभारे, अक्षय बनसोडे, संजय टिके यांची उपस्थिती होती.
१९८२ मध्ये ऍड बाळासाहेब आंबेडकर हे राजकारणात सक्रिय झाले होते पहिल्यांदा लोह्यात त्याचा भव्य जंगी सत्कार आंबेडकरी चळवळीचे निर्भीड नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष संभाजीराव धुतमल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.त्यानंतर पहिल्यांदाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर हे लोह्यात येत आहेत .तेव्हा विविध राजकीय पक्षात कार्यरत असलेले कार्यकर्ते पक्ष भूमिका बाजूला ठेवून त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत
वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण च्या वतीने सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ डिसें. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता व्यकटेश गार्डन येथे ” निर्धार मेळावा ” वंचित बहुजन युवकांचे आयकॉन सुजात आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनाने राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे वंचित चे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा , प्रदेश उपाध्यक्ष किशन चव्हाण, गोविंद दळवी, राज्य प्रवक्ते फारूक अहमद, राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ , सविताताई मुंडे ,राजेंद्र पातोडे अमित भुईगळ ,अशोक हिंगे पाटील, अक्षय बनसोडे, केशव मुद्देवाड ,डॉ संघरत्न कुरे ,उत्तम इंगोले ,मोहन राठोड.भाबौम सभेचे जिल्हाध्यक्ष पी एम वाघमारे हे उपस्थित राहणार .मागील विधानसभा निवडणुकीत वंचित उमेदवार शिवा नरंगले यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती या जागेवर ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः विशेष लक्ष केंद्रित केले आहे.त्यादृष्टीने हा मेळावा महत्वाचा मानला जातो.यात युवा नेते सुजात आंबेडकर हे युवक व कार्यकर्ते याना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे लोहा कंधार मतदार संघाचे लक्ष लागले आहे
दरम्यान गुरुवारी सुजात आंबेडकर यांची नांदेड सिडको येथील रमाई चौकापासून मोटारसायकल रॅली कंधार मार्गे लोह्या पर्यंत काढण्यात येणार आहे . जागोजागी त्याचे विविध संघटना च्या वतीने त्यांचा सत्कार होणार आहे या निर्धार मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी केले आहे.शहरात लोहा तालुका वंचित च्या वतीने तालुकाध्यक्ष सतीश आनेराव, सदानंद धुतमल, हटकर व कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे



