मुंबई येथे होणाऱ्या संविधान सन्मान सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे —सतीश आणेराव !

मुंबई येथील संविधान सन्मान महासभेला लोहा तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — सतीश आणेराव
—————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे)
मुंबई येथे दि. २६ नोव्हेंबर संविधान दिनी वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले असून तेव्हा या संविधान सन्मान महासभेला लोहा तालुक्यातील सर्व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन महासंघाचे लोहा तालुकाध्यक्ष सतीश आणेराव यांनी केले आहे.
दि. २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनी संपूर्ण भारतामध्ये संविधानचा प्रचार प्रसार व्हावा भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना समता , स्वतंत्र , बंधुता ,मान, सन्मान , न्याय , मुलभूत हक्क, मतदानाचा अधिकार ,आदी दिले असून तेव्हा भारतीय संविधान बचविण्यासाठी दि. २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला लोहा तालुक्यातील सर्व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे लोहा तालुकाध्यक्ष सतीश आणेराव यांनी केले आहे.



