मतदार यादी पुनर्रनिरीक्षन (SIR) अचुक व्हावे ; दिरंगाई करू नका — उपविभागीय अधिकारी विलास नरवटे!

मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अचूक व्हावे ; दिरंगाई करू नका उपविभागीय अधिकारी विलास नरवटे
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी पुनरीक्षणासाठी नियुक्त केलेल्या बीएलओ व पर्यवेक्षक याच्या कामाचा आढावा
उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी घेतला .यादी पुनर्निरीक्षण करताना येणाऱ्या अडचणी त्याची सोडवणूक करतानाच कामाची गती वाढवावी तसेच कोणीही मतदार विसरून राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कामचुकारपणा करू नये असा सूचना उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी दिल्या
लोहा तहसील कार्यालयात बुधवारी (१५ जुलै) उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, महिला व बालकल्याण अधिकारी माने, निवडणूक नायब तहसीलदार डॉ हाडगे, नायब तहसीलदार तालुका आरोग्य अधिकारी डॉ कांबळे, सा बा विभागाचे इंजि सोमवंशी, विस्तार अधिकारी देशपांडे, श्री चांदणे, विभाग प्रमुख
गायंगी यासह पर्यवेक्षक, बीएलओ उपस्थित होत
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (SIR) निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कंधारचे उपविभागीय अधिकारी लोहा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विलास नरवटे हे लोहा कंधार तालुक्यातील कामाचा दररोज आढावा घेत आहेत ..लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर व कंधार तहसीलदार
तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यासह उपस्थितीत जेथे अडचणी आहेत काम कमी झाले आहे त्याच्याशी संवाद साधत आहेत
विविध गावांतील मतदान केंद्रांना भेटी देत त्यांनी मतदार नोंदणी बाबत जाणून घेत आहेत
पाहणीदरम्यान नवीन पात्र मतदारांची नोंदणी, मयत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे आणि प्रत्येक अर्जाची काटेकोर पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित बीएलओ याना देण्यात आल्या. “पुनरीक्षणाचे काम गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित एका महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाले पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी दिले.
बीएलओ, शिक्षक, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींशी थेट संवाद कामातील अडचणी जाणून घेत आहेत . ग्रामीण भागात घरभेटींद्वारे सुरू असलेल्या मतदार मॅपिंग व एस आय आर कामाचा आढावा व बैठका घेणे सुरु आहे बाल विकास अधिकारी माने, पर्येवेक्षक चंद्रकांत मेकाले, संतोष साखरे, राजू पाटील, विलास मंगनाळे, जी. एस. मंगनाळे बीएलओ काहलेकर यासह कर्मचारी उपस्थित होते
यासाठी विभाग प्रमुख गायंगी, अव्वल कारकून बटलवाड महेंद्र कांबळे , धुळगंडे, पांचाळ, मलगे हे परिसब



