प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक; सायाळच्या जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम !

प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक
सायाळ जिल्हापरिषदेचा अभिनव उपक्रम
“””””””””””””””””””””””””””””””””””””””
लोहा (रत्नाकर महाबळे)
आज नांदेड जिल्ह्यामध्ये सगळीकडे शाळांना सुरुवात झाली.प्रदीर्घ सुट्ट्यानंतर आज पुन्हा शाळा विद्यार्थ्यांनी गलबलू लागल्या. लोहा तालुक्यातील सायाळ या शाळेमध्ये एकूण प्रवेश पात्र 20 मुला-मुलींची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये ग्रामपंचायतचे सरपंच श्री अण्णासाहेब पवार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शेतीनिष्ठ युवा शेतकरी रत्नाकर पाटील ढगे,रामेश्वर पाटील पवार, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माऊली पाटील पवार , ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव पाटील मोरतळे, बळीराम पाटील पवार, शिक्षण प्रेमी नागरिक सरदार सिंह ठाकुर यांच्यासह अनेक शिक्षण प्रेमी महिला पुरुषांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.गावातील शिक्षण प्रेमी नागरिक गिरमाजी पवार यांनी बैलांना रंगवून सजवून आणि गोंडे व झूल घालून सजून आपली बैलगाडी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना तयार करून दिली. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली शाळेत आल्यानंतर शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि खाऊ भरऊन भव्य स्वागत केले. आनंददायी वातावरणामध्ये सर्वेक्षणानुसार प्रवेशपात्र 20 पैकी 20 विद्यार्थ्यांचा आज प्रवेश निश्चित करण्यात आला.प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे आई-वडीलही या मिरवणूकीत सहभागी झाले होते.
आनंददाई वातावरणामध्ये प्रवेशोत्सव साजरा झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेबद्दलची भीती दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवून शिक्षण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी मदत होईल.असे मनोगत शाळेचे मुख्याध्यापक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरसीकर यांनी व्यक्त केले.प्रवेशोत्सव आनंददायी,उत्कृष्ट आणि यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ. योजना चिद्रावार सौ.अनिता बिरादार,श्रीमती मंगला गुंडाळे सौ.कल्पना चामवाड कुमारी ज्योती काळम, अंगणवाडी कार्यकर्ती सौ सविता पवार,सौ.अरुना ठाकूर यांनी प्रयत्न केले.



