Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोहा पंचायत समितीला मिळाले आय एस ओ नामांकन

लोहा पंचायत समितीला मिळाले आय एस ओ नामांकन !
———————————————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे) लोहा पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते आय एस ओ नामांकन मिळाले आहे त्यामुळे लोहा पंचायत समिती कारभार आता होणार असून सामान्य जनतेच्या कामाचा निपटारा लवकरात लवकर होण्यास मदत मिळणार आहे जिल्ह्यात नांदेड नंतर लोहा पंचायत समिती ही आयएसओ मिळणारी दुसरी पंचायत समिती ठरली आहे
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी पंचायत समितीला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी करून त्यावर समाधान व्यक्त केले‌.
आता लोहा पंचायत समिती ही हायटेक होणार असून सर्व शाखेचे कपाटातील दप्तर अद्यावत होणार आहे आणि काही सेकंदात फाईल देखील सापडणार आहे पंचायत समिती कार्यालयात सर्व विभाग प्रमुख यांना स्वतंत्र टेबल देण्यात आलेले आहे तसेच परिसराची स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे सर्व शाखेचे रेकॉर्ड रजिस्टेला नोंदी घेत सदर रेकॉर्ड अद्यावत करण्यात आले आहे त्यामुळे कोणती फाईल कुठे आहे हे दहा सेकंदाच्या आत मिळणार आहे अभिलेख कक्ष देखील सुव्यवस्थित करण्यात आला आहे त्याचबरोबर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देखील देण्यात आला असून सर्वत्र स्वच्छता प्रत्येक टेबलवर आवश्यक ते साहित्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व विभागात रंगरंगोटी हे काम घेऊन येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना कार्यालयामध्ये प्रवेश करतात समाधान मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आली आहे हे सर्व कार्यालय हायटेक करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी के आडेराघो, सहाय्यक प्रशासन अधिकारी , सतिश चोरमले, प्रियदर्शन वाघमारे, आय एस ओ चिफ एडिटर अनिल येवले, आस्थापना विभाग प्रमुख ए.एन पांचाळ,पि एच इजपवार, घरकुल योजना विभाग प्रमुख दिनेश तेलंग यांच्या सह कार्यालयात कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button