कोष्टवाडीच्या विषबाधा प्रकरणात रुग्णवाहिकेच्या चालकांनी वाचवले अनेकांचे जीव !

संत बाळुमामाच्या महाप्रसादातुन विषबाधा; 108/102 रुग्णवाहिका ने हजारो लोक वाचविले
———————–+——————-
लोहा +रत्नाकर महाबळे)
लोहा तालुक्यातील कोष्टवाडी परीसरात संत बाळुमामा यांच्या पालखी सोहळ्यात आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादात काल दि.(६) फेब्रुवारी रोजी एकादशी असल्यामुळे भाविकांना भगर हा महाप्रसाद करण्यात आला होता या महाप्रसादात विषबाधा झाल्यामुळे कोष्टवाडी,सावरगाव हरणवाडी,रिसनगांव,पेंडु, मुरंबी, मस्की हुलायवाडी, नरवटवाडी आष्टुर रामतीर्थ सह परीसरात अन्य गावातील व्यक्तींना तो भंडाऱ्याचा महाप्रसाद सेवन केल्याने विषबाधा झाली असुन यामध्ये दोन ते तीन हजार लोकांचा समावेश असुन सदरील रुग्णांना शासकीय रुग्णालय लोहा येथे तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात आंतररूग्ण विभागात ७०० रुग्ण दाखल केले तर जिल्हा रूग्णालयात सरासरी १५०० रूग्ण रेफर केले.यावेळी१०२ च्या ८ रूग्णवाहीका तर १०८ च्या 6 रूग्णवाहीका तसेच एस टी बस सह अन्य खाजगी वाहनांने काही रुग्णांना शासकीय रुग्णालय नांदेड,अहमदपूर येथे दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार प्रकिया चालु असल्याचे डॉ.बारी वैद्यकीय अधीक्षक, डॉ.पानसुळे, डॉ.भालके मैडम,डॉ.जाधव, डॉ.कुलदिपके, डॉ.सोनकांबळे,डॉ.लोहारे, डॉ.दिनेश राठोड, डॉ.मोटे, आपात्कालीन वैद्यकीय सेवा जिल्हा व्यवस्थापक डॉ सुनील कुलकर्णी साहेब व EMSO CODNETARसचिन कोताकोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली,१०८ चे चालक सिद्धार्थ ससाणे यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून सर्व रुग्णवाहिका ला फोन करून बोलावून घेतले रुग्णांचे प्राण वाचवले.तसेच लोहा पत्रकार संघाचे विलास सावळे, शिवराज पवार,संजय कहाळेकर, प्रविण महाबळे,विनोद महाबळे,मारोती चव्हाण यांनी पोलिस निरीक्षक अधिक्षक,तहसीलदार शंकर लाड,
या कामी 108 चे चालक सिद्धार्थ ससाणे, गौतम खंडागळे, सिद्धार्थ घुगे , सोपान लाडेकर, शंकर शेवाळे, सदाशिव जाधव सुरेश बोइनवाड, डॉ मुंदडा, डॉ, धनंजय पाटील, डॉ सिवराज येवलीकर, डॉ सिद्धेश्वर केंद्रे, डॉ सचिन बोकारे 102 चे चालक अतीश कांबळे, बालाजी घोडके,सुरेश जाधव, प्रदिप मेहर, रहेमान शेख ,दिपक फुलवळे बोईनवाड ,विशेष मदत.. गोविंद कोपनर सर प्रे,को.क्लासेस,लोहा स्वामी सिस्टर, ज्योती वाघमारे,आदिती गांजापूरकर सिस्टर,चाटे सिस्टर,कलमे सिस्टर,तेलंग,खिल्लारे, केंद्रे मामा आदींनी रूग्णांना उपचारासाठी भरपूर प्रमाणात मदत करत शर्थीचे प्रयत्न केले. विषबाधा झालेली बातमी कळताच माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी भेट देऊन विचारपूस करत रूग्णांच्या नातेवाईकांना खिचडीचे वाटप केले.
——————————————-
विषबाधा ची बातमी कळताच ,शेल्यचिकत्सक डॉ निळकंठ भोसीकर साहेब व आपात्कालीन वैद्यकीय सेवा 108 जिल्हा व्यवस्थापक डॉ सुनील कुलकर्णी साहेब EMSO CODNETARसचिन कोताकोंडावार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 108 व 102 रुग्णवाहिका ड्रायव्हर ने अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा बजावत व हजारो रुग्ण वाचवले..108 व 102 रुग्णवाहिका ड्रायव्हर चे करावे तेवढे कौतुक कमीच .


