Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

उपमुख्याध्यापक बी डी जाधव सेवावृत्ती निमित्ताने आज लोह्यातील व्यंकटेश गार्डन येथे गौरव सोहळा !

उपमुख्याध्यापक बी डी जाधव सेवानिवृती निमित्ताने आज लोह्यात गौरव सोहळा !
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे )
श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बी डी जाधव हे ३३ वर्षाच्या सेवे नंतर आज ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव माजी आ भाई गुरुनाथराव कुरुडे याच्या अध्यक्षतेखाली बुधवारी व्यंकटेश गार्डन येथे सकाळी साडे दहा वाजता सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न होत आहे.
बी डी जाधव हे कडक शिस्तीचे क्रीडा शिक्षक आहेत.त्याची बॉसकेट बॉल , हॅन्ड बॉल या खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविले आहेत. लोह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रांत त्याचे मोठे योगदान आहे.त्याची ३३ वर्ष माध्यमिक शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक म्हणून सेवा झाली आहे.सेवापूर्ती गौरव सोहळा खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई गुरूनाथराव कुरुडे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन अण्णा हंबर्डे,माजी आमदार रोहिदास चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे, ऍड मुक्तेश्वर धोंडगे, माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे,वैज्ञानिक डॉ निलेश मोटे (बेंगलोर ) यांची उपस्थिती राहणार असून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री बोधगिरे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button