रिक्षाचालक नरेंद्र गायकवाड बनला महाराष्ट्राच्या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष !

रिक्षाचालक नरेंद्र गायकवाड बनला महाराष्ट्राच्या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष !
—————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे )
लोहा तालुक्याचे भूमिपुत्र व पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड याची महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा -टॅक्सी चालक -मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर एकमतेने निवड झाली आहे
ऑटो ,टॅक्सी, बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.लोह्याचे भूमिपुत्र व पंचायत समितीचे माजी उपसभापती
नरेंद्र गायकवाड (नांदेड ) यांची ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.नरेंद्र हे रिक्षा चालक होते त्याचे संघटन कौशल्य व वक्तृत्व चांगले आहे गेल्या अनेक वर्षा पासून ते ऑटोरिक्षा चालकांचे प्रश्न रस्त्यावर येऊन सोडवित आहेत.पँथर पॉवर संघटनेचे संस्थापक आहेत.
फेडरेशनचे अध्यक्ष गफार भाई नदाफ( कराड), कृती समितीचे कार्याध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश जाधव, कृती समितीचे कार्याध्यक्ष वैजनाथ देशमुख ( नांदेड ), राज्य सरचिटणीस शिवाजी गोरे राजू, उपाध्यक्ष बबलू अतिश खान,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम पाटील (सांगली ), वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद तांबे (पुणे ,)
ज्ञानेश्वर हुमने (चंद्रपूर) , इलियास लोदी (अकोला,)
बाळासाहेब फाळके (सोलापूर ,) राकेश जाधव (मुंबई ), बालाजी कोकरे ,शेख अजिज (नांदेड, )
पुंडलिक कुठे (नाशिक ,) भीमराव तायडे (जळगाव )मो बशीर खान (संभाजीनगर,)
विष्णुकांत जांभळे (सातारा, राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील रिक्षा नेते मंडळी उपस्थित होते
यात राज्यातील 550 संघटनांची कृती समितीचा समावेश आहे शासनाने ऑटो चालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना पेन्शन मिळावे, घरकुल द्यावेत असा अनेक मागण्या साठी सरकार दरबारी जाऊन ऑटो रिक्षावाला न्याय देण्याची आपण काम करू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केला.खा प्रतापराव पाटील चिखलीकर, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते , प्राणिताताई देवरे चिखलीकर यासह विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्याचे अभिनंदन केले आहे


