क्राईम
अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक

पुणे : ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. ससून रूग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललितला चेन्नईत मुंबई पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने शनिवारपर्यंत (२१ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.



