पहिल्याच पावसात संरक्षण भिंत पावसामुळे कोसळली; सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे !

पहिल्याच पावसात संरक्षण भिंत पावसामुळे कोसळली
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे !
———————————————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे) लोहा शहरात परवाच्या दिवशी झालेल्या पहिल्याच पावसामध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची संरक्षण भिंत पाण्यामुळे कोसळली असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.
शहरातील शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आयटीआयची व्यवस्था करण्यात आली आहे नांदेड लातूर रोडवरील जागेमध्ये भव्य आयटीआयची इमारत देखील उभी करण्यात आली आहे आणि त्या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे संबंधित कंत्राटदार याने ही इमारत अत्यंत निकृष्ट दर्जाचा माल वापरून तयार केली आहे आयटीआय मध्ये प्रशिक्षण देण्प्रयासाठी उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळा इमारतीला तडे गेले आहेत या होत असलेल्या संपूर्ण कामाची कंत्राटदार व संबंधित अभियंत्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे
असून संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गुत्तेदाराला दिलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून परवाच्या दिवशी झालेल्या पावसामुळे बांधकाम करण्यात आलेली संरक्षण भिंत पूर्णता पडली आहे भविष्यात भव्य बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतीस तडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अगदी माळाच्या कडेला आयटीआय ची इमारत असून अजून पावसाळ्यात जर मोठा पाऊस आला तर त्या इमारतीला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून त्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
अभियंता बलराज सोमवंशी यांची
उडवाउडवीची उत्तरे!
आयटीआयची ही संरक्षण भिंत पावसामुळे कोसळली असल्याची माहिती संबंधित पत्रकारांना मिळाली असता ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्याची पाहणी केली असता या कामाबाबत ची माहिती संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बलराज सोमवंशी यांना विचारले असता ते माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माहितीच्या अधिकाराखाली कार्यालयात अर्ज करावा अशा प्रकारची बेजबाबदार उत्तरे त्यांनी दिली आहेत त्यांची देखील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.



