Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

बनावट दारू विक्री अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; ८ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त !

राज्य उत्पादन शुल्काची अतुलनीय कामगिरी
————————
आष्टुर -साकुड येथे बनावट व गोवा दारू विक्री अड्ड्यावर धाड : आंतरजिल्हा टोळी उघड ;८ लक्ष ५३ हजाराचा ऐवज जप्त
——————————————

●साकुड ( ता आंबेजोगाई) येथील बनावट दारू ठिकाणावर छाप
●मुख्य सप्लायस येरमाळा ( जि उस्मानाबाद) फरार
● दोघांना चार दिवस ११ तारखे एक्ससाईज कोठडी
● दुय्यम निरीक्षक (देगलूर विभाग) आर डी सोनवणे व टीमची धाडसी कार्यवाही
—– ———– — ——————-
लोहा ( रत्नाकर महाबळे)

राज्य उत्पादन शुल्क विभाग देगलूर अंतर्गत लोहा कंधार तालुका येतो .तालुक्यातील आष्टुर येथे बनावट विदेशी दारू व गोवा राज्यातील आलेली दारू विकली जाते अशी माहिती भेटल्या नंतर या विभागाचे दुय्यम निरीक्षक आर डी सोनवणे व त्याच्या पथकाने आष्टुर गावात अवैध दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकला. बनावट विदेशी दारू, व तयार करण्याचे साहित्य गोवा दारू जप्त केली बनावट दारू आंबेजोगाई तालुक्यातील साकुड येथे बनवली जाते . आरोपीला सोबत नेऊन व तेथेही धाड टाकली.तेथे बनावट विदेशी दारू व तयार करण्याचे साहित्य जप्त केले. यात दोघांना अटक करण्यात आली . त वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केले असून ८लक्ष ५३ हजार ५८३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे..ही घटना ७ रोजी घडली.नांदेड “राउशु “विभागाचे अधीक्षक कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही” अतुलनीय ” कामगिरी असून या दोन दशकातील ही लोहा तालुक्यातील दारू वरील सर्वात मोठी या विभागाची कार्यवाही होय
लोहा तालुक्यातील आष्टुर. येथे अवैधपणे बनावट मद्याची चोरटी विक्री केली जाते अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्वतः राज्य उत्पादन शुल्क विभाग ( राउशु ) नांदेडचे अधीक्षक अतुल कानडे देगलूर विभागाचे दुय्यम निरीक्षक डी.आर स सोनवणे यांचा टीमने ७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या गावातील अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकली यात आरोपी पंडित मारोती गोटमूकले याना ताब्यात घेतले
त्यांच्या कडील १८० मि.ली. देशी दारुचे १४४ सिलबंद बाटल्या, ९० मि.ली. देशी दारुचे ९६ सिलबंद बाटल्या, बनावट मॅकडॉन नं.१ नावाचे विदेशी दारू १०६ बाटल्या, रॉयल स्टंग विदेशी मद्याच्या २१ सिलबंद बाटल्या व एक मोबाईल जप्त केला

आष्टुर च्या आरोपीने मौ. साकुड ( ता. आंबाजोगाई जि. बीड ) एका शेतात बनावट माल व साहित्य आणल्याची कबुली दिल्या, अटक आरोपी व “राउशु ” विभागाची टीम घेऊन मौ. साकुड (ता. आंबाजोगाई) येथे गेली त्या ठिकाणावर छापा मारला छापा मारला त्यात १८० मि.ली च्या बनावट विदेशी मद्यच्या नंबर वन
मॅगडॉल च्या १४४ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की १९२ सीलबंद बाटल्या, गोवा राज्यातून विक्रीसाठी असणान्या विदेशी मद्यच्या इमपेरियल ब्ल्यू च्या (४८० बाटल्या,) १८० मी. ली च्या गोवा स्टेटच्या रॉयल चॉलेज विस्कीच्या ( ५२८ सीलबंद बाटल्या, ) ७५० मी.ली च्या गोवा राज्याच्या विदेशी मद्यच्या रॉयल क्लासिक विस्की ( ९६ बाटल्या), ७५० मी.ली च्या विदेशी मद्यच्या अड्रिल क्लासिक विस्कीच्या ( ६० बाटल्या), विदेशी मद्याच्या २५ बनावट लेबल, विदेशी मद्याच्या १४९९ बनावट बुचे व रॉयल चॉलेज व्हिस्की विदेशी मद्याच्या २०५ रिकाम्या बाटल्या, असा मोठा साठा तसेच एक मोबाईल, एक टाटा सुमो चार एक दुचाकी (स्कूटी) हे वाहन असा एकूण ८, लक्ष ५३ हजार ,५८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे चालविणारा आरोपी महादेव उर्फ अण्णा बालासाहेब धारमोडे (रा. दौनापुर पोस्ट- नागापुर ता. परळी ) यास अटक करण्यात आली.त्याने सांगितले की सदर बनावट मद्य व मद्य निर्मिती करण्या करिता लागणारे साहित्य तो नामे जावेद युनूस ईनामदार ( रा.यरमाळा ता. कळंब जि. धारशिव) यांच्याकडून आणले .त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम असतो
आरोपी जावेद युनूस ईनामदार याच्या शोधात रा. यरमाळा (ता. कळंब जि. धारशिव ) येथे गेली पण तो आरोपी झाला त्याचा शोध सुरू आहे
राउशु.विभागाचे जवान विकास नागमवाड, यांनी दिलेल्या फिर्यादी देगलूर विभागाचे दुय्यम निरीक्षक यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ), (ब) (ड), (ई) (एफ), ८०,८१,८३,व ९०, भारतीय दंड विधान चे कलम ३२८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे तपास स्वतः श्री सोनवणे, करित आहे.दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची म्हणजे ११ तारखे पर्यंत एक्साईज कोठडी सुनावली आहे.
दोन्ही गुन्ह्यात अधीक्षक . अतुल कानडे कामगिरीवर होते निरीक्षक .एस.एस.खंडेराय, .ए.एम. पठाण, . आशिष महिंद्रकर, दुय्यम निरीक्षक . राजकिरण सोनवणे, . अनिल पिकले, .एस.टी.कुबडे,.बी.बी.इथ्थर,, सहाय्यक दुय्यम निरीक्षक. बालाजी पवार, . शिवाजी कारनुळे, विकास नागमवाड, .जी. डी. रेनके, . श्रिनिवास वजिराबादे, मुरलीधर आनकाडे, चालक . खतिब फाजिल,. संतोष संगेवार यांच्या पथकाने ही “अतुल”निय कामगिरी करत आंतरजिल्हा बनावट दारू विक्रीचे रॅकेट उघड केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button