Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोहा पोलीस ऍक्शन मोडवर अवैध धंद्यावर कारवाई !

लोहा पोलीस ऍक्शन मोडवर ; मटका -गुटका -गुडगुडी-अवैध धंदे बंद.(?)
————————
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा शहराच्या हद्दीत खुले आम मटका सुरू ..जागोजागी गेल्या तीन वर्षा पासून बुक्क्या थाटल्या. हा धंदा “” जोरात सुरू असतानाच दिवाळी नंतर गुडगुडी अवतरली. आणि मटका विरुद्ध गुडगुडी असेच चित्र काही समोरची आले
ते बंद व्हावेत यासाठी सामाजिक व राजकीय संघटना यांनी निवेदन दिले त्या पार्श्वभूमीवर लोहा पोलीस अवैध धंद्या विरुद्ध एक्शन मोडवर आहेत .जनतेनी या बाबत सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले आहे.
लोहा शहरात मटका व गुटका कधीच बंद झाला नाही.गुटका जसा खुले आम टपरीवर ,दुकानावर ऐटीत वावरत असतो तसाच मटका सुद्धा जागोजागी- बुक्यांनी थाटात उभा असतो.ऐन बस स्थानकात सुद्धा हा मटका मोठ्या दिमाखात परवानगीधारक असल्यागत मिरवीत असतो.पण कोणीच त्यावर कार्यवाही केली नाही.ना एसटी मंडळ नाही पोलीस पुढे आले.त्यामुळे जागोजागी मटक्याच्या बुक्या तसा गुटख्याच्या माळा खुलेआम मोठ्या दिमाखात लोंबकळत असलेल्या दिसतात.पण गुडगुडी-मटका याच्या रस्सीखेचेत दोघा विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणिअवैध धंदे चालक कोणत्याही थराला जाऊ शकतात.तशी चर्चासर्वत्र सुरू झाली आहे.
लोहा शहरात मटका गुडगुडी असे अवैध धंदे खुले आम सुरू झाल्याचे पडसाद सोशल मीडियावर व शहरात उमटले.त्यातच खंडणीचा एक गुन्हा दाखल झाला सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी अवैध धंदे बंद करावेत असा आशयाचे निवेदन तहसीलदार , वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना दिले.सर्व समाजमन ढवळून निघाले.या सगळ्या घडामोडीत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर एक्शन मोडवर आहेत. त्यांनी मटका-गुटका-गुडगुडी व सर्व अवैध चालू देणार नाही.तसे आढळल्यास कार्यवाही करू असा इशारा दिला आहे .
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी जवळपास तीन महिन्यात शहराला वाहतूक व नियमाची शिस्त लावली. बटन खुले सोडून फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवही करणारे पोलीस निरीक्षक यांनी आता गुटका-मटका-गुडगुडी,-अवैध वाळू, अतिक्रमणे, यावर कार्यवाही करण्याचे जाहीरपणे सांगितले आहे
.. दबंग पोलीस अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या श्री चिंचोळकर व टीम एक्शन मोडवर असून त्यांनी मटका-गुटका-गुडगुडी व अन्य अवैध व्यवसाय बंद करण्यात ठोस पावले उचलली आहेत दोन दिवसांपूर्वीच .बेकायदेशीर दारू विकणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.व दारू जप्त केली आहे.
पोलिसांच्या भूमिकेमुळे गुटका विकणाऱ्याच व खुलेआम मटका बुक्की चालविणारे, गुडगुडी वाले याचे धाबे दणाणले आहेत.गुटका पुरवठा धारक काही काळ धंदा बंद करतील असेही बोलले जात आहे. याची अंमलबजावणी कशी होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button